मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र, आता माघारी फिरणार नाही; वसंत मोरेंच्या डोळ्यात पाणी, कंठ दाटला
1448 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करापुण्यातील फायरब्रँड नेते वसंत मोरेंनी आज (१२ मार्च) मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे. याच पार्श्वभूमीवर, कार्यकर्ते आणि समर्थकांनी मोरेंच्या निवासस्थानाबाहेर मोठी गर्दी केली आहे.यावेळी, आपल्याच निवासस्थानाबाहेर वसंत मोरेंनी माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली.आपली भूमिका स्पष्ट करताना यावेळी वसंत मोरेंचा कंठ दाटला, तर डोळ्यातही पाणी पाहायला मिळालं.मी पक्ष सोडलाय, परत फिरणार नाही, पुढची भूमिका पुणेकरांशी बोलून सांगेन, असं मोरे म्हणाले.मी वाढवलेला पक्ष संपवण्याचं काम काहींनी केलं, वरिष्ठांपर्यंत चुकीच्या गोष्टी पोहोचवलाय, आता मला......अशा लोकांसोबत कामच करायचं नाही, असं वसंत मोरे म्हणाले.