मी खासदार होणार याची शर्मिला वहिनींना शाश्वती, निवडून आल्यानंतर आशीर्वाद घ्यायला जाणार | वसंत मोरे
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
मनसेचा राजीनामा दिल्यानंतर कालची राज ठाकरेंची सभा काल मीस केली असं वसंत मोरे म्हणाले.मी पक्ष सोडल्यानंतर माझ्या विचारांशी मी ठाम आहे असं वसंत मोरेंनी सांगितलं.रवींद्र धंगेकरांनी काम केलं असेल तर लोक त्यांना मतदान करतील असं मोरेंनी सांगितलं.कसबा पॅटर्न पेक्षा विकासाचा कात्रज पॅटर्न पुणे शहरात चालेल असंही मोरेंनी सांगितलं.तसंच पुणे लोकसभा मतदारसंघातून खासदार होणार असल्याचा विश्वास मोरेंनी व्यक्त केला.वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून दिल्लीला जाणार असं वसंत मोरे म्हणाले.खासदार निवडून आल्यानंतर शर्मिला ठाकरेंचा आशीर्वाद घ्यायला जाणार असंही मोरेंनी सांगितलं.