काँग्रेसमधून धंगेकर, मोहन जोशींच्या नावाची चर्चा, लोकसभेच्या उमेदवारीवर शहराध्यक्ष म्हणतात 'नो कमेंट्स!'
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
पुण्याचे दिवंगत खासदार गिरीश बापटांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली. लवकरच या जागेवर पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. एकीकडे 'मविआ'त ही जागा काँग्रेस की राष्ट्रवादी लढवणार यावरून संघर्ष सुरू आहे. अशातच काँग्रेसमध्ये देखील उमेदवारीसाठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे. काँग्रेसमधून शहराध्यक्ष अरविंद शिंदे, मोहन जोशी, आमदार रवींद्र धंगेकर यांची नावे चर्चेत आहेत. तर लोकसभेसाठी धंगेकरांना तयारी करण्याचे आदेश दिल्याची बातमी समोर आली होती. मात्र या बातमीच स्वतः रवींद्र धंगेकर यांनी खंडन केलं आहे. तर उमेदवारीच्या चर्चेवर काँग्रेसचे अरविंद शिंदे यांनी बोलणं टाळलं आहे.