आमच्या दुधासाठी, कांद्यासाठी, शेतमालासाठी तुम्ही भांडा, महिला शेतकऱ्यांचं अमोल कोल्हेंसमोर गाऱ्हाणं14
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमोल कोल्हे जोरदार प्रचार करत आहेत.याच प्रचारावेळी महिला शेतकऱ्यांनी अमोल कोल्हे यांच्यासमोर शेती प्रश्नाविषयी गाऱ्हाणं माडलंय.त्या म्हणाल्या, कांदा लागवडी पासून काढणी पर्यंत ८० ते ९० हजार रुपये खर्च झाला आहे.आता बाजारभाव मात्र पडले असल्याने हातात काहीच शिल्लक राहणार नाही.गाडी भाडे आणि मजुरांचा रोज देखील देता येत नाही. आमच्या दुधासाठी, कांद्यासाठी तुम्ही भांडा.अशी विनंती या महिलांनी खासदार डॉ. कोल्हे यांच्याकडे प्रचारावेळी केली आहे.