डेरीला दूध देऊन फायदा मिळेना, स्वतःचा व्यवसाय थाटला अन् कमावतायत भरघोस उत्पन्न
1243 views
pune चे व्हिडिओ सबस्क्राईब करामागील २५ ते ३० वर्षांपासून दूध व्यवसाय करूनही अपेक्षित नफा मिळत नसल्याने मागील दीड वर्षांपासून दुधापासून विविध पदार्थ बनवण्याचा निर्णय घेतला. आणि आज घरच्या दुधापासून पेढे, बासुंदी, खवा, कुल्फी,पनीर असे विविध पदार्थ बनवून विकल्याने अपेक्षित नफा मिळवण्यात एका युवकाने यश मिळवले आहे.. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील सराफवाडी येथील हा युवक आहे. स्वप्निल शिंदे असे या युवकाचे नाव आहे. अलीकडच्या काळात ठिकठिकाणीच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाला योग्य भाव मिळत नसल्याने त्यांच्यात नाराजी असल्याचे दिसते. मात्र दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या दुधाचा उपयोग विविध पदार्थ बनवून ते बाजारात विकल्यास नक्कीच फायदा होऊ शकतो हे स्वप्निल यांनी दाखवून दिलंय.