मराठी पाट्यांचा मुद्दा पेटला, मनसेचं खळखट्याक्; अलिबागमधील अमराठी पाट्यांना फासलं काळं
रायगड चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
महाराष्ट्रातील दुकानं, आस्थापनांचे नामफलक मराठी देवनागरी लिपीत ठळक अक्षरात असणं बंधनकारक असूनही आणि सुप्रीम कोर्टाने आदेश देऊनही अनेक दुकानदारांनी दुकानांचे फलक मराठीत न लिहिल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता चांगलीच आक्रमक झाली आहे. अलिबागमध्ये आक्रमक पवित्रा घेत मनसैनिकांनी अमराठी पाट्यांना काळं फासण्याचं आंदोलन हाती घेतलं. सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातील दुकानांच्या पाट्या या मराठीतच लावण्याचे आदेश दिले असून २५ नोव्हेंबर ही शेवटची तारीख दिली होती. ही मुदत संपल्याने अमराठी पाट्या कायम असलेल्या दुकानदारांविरोधात मनसेने आक्रमक पवित्रा घेतला. फलकांना काळं फासत मनसैनिकांनी दुकानदारांना ३ दिवसांत फलक मराठीत लावण्याचा इशारा दिलाय.