पूर्वीची शिवसेना आता नाही, तशीच रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभाही शिंदेंना मिळणार नाही; भाजपची भूमिका
1062 views
रत्नागिरी चे व्हिडिओ सबस्क्राईब करारत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा पारंपरिक आमचा असून १९९० पासून तात्यासाहेब नातूंनी हा लोकसभा मतदारसंघ लढवला असून आम्ही आजवर शिवसेनेचे काम करत आलो आहोत. त्यामुळे कोणीही दावे प्रतितावे केले तरीसुद्धा रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ भाजपलाच मिळणार आणि आमचं कमळ फुलणार अशी प्रतिक्रिया माजी आमदार बाळ माने व भाजपच्या कार्यकर्त्यांनी दिली. त्यामुळे कोणीही काही म्हणू द्यात उद्या निवडून आल्यानंतर ठाकरे गटाचा तरी किंवा अन्य पक्षात जातील त्यामुळे येथे उमेदवार हा भाजपचाच असेल अशी प्रतिक्रिया बाळ माने यांनी दिली आहे