चिरंजीव विक्रांत जाधवांचं भाषण ऐकून भास्कर जाधवांना अश्रू अनावर, आक्रमक भाषणानंतर तोंडभरून कौतुक!
रत्नागिरी चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
ठाकरे गटाचे दिग्गज नेते भास्कर जाधव पक्षामध्ये नाराज असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. भाजप नेते नितेश राणेंसोबत झालेल्या राड्यानंतर पक्षाने दखल घेतली नसल्याची खंत व्यक्त केली होती. तसेच भास्कर जाधवांनी भावनिक पत्र लिहित कार्यकर्त्यांना एकत्र येण्याचे आवाहन केल्याने विविझ चर्चांना उधाण आले होते. आज भास्कर जाधव यांनी चिपळूण येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधत आपली भूमिका मांडली. त्याआधी चिरंजीव विक्रांत जाधव यांनी केलेले भाषण ऐकून भास्कर जाधव मंचावरच रडल्याचे पाहायला मिळाले. या मेळाव्यात भास्कर जाधव यांचा मुलगा विक्रांत जाधवांनी विरोधकांवर हल्लाबोल करत आक्रमक भाषण केले.