कर्मचाऱ्यांना पगार नाही, राजापूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला माजी सभापतींनी ठोकले टाळे
रत्नागिरी चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
माजी सभापती दीपक नागले यांनी राजापूर पंचायत समिती शिक्षण विभागाला टाळे लावले आहे. जोपर्यंत तात्पुरती नेमणूक केलेल्या डीएड आणि बीएड पदवीधर तासिका मानधन तत्वावर नेमलेल्याकर्मचाऱ्यांचा पगार होत नाही तोपर्यंत टाळे उघडण्यात येणार नाही, असं त्यांनी यावेळी सांगितले.तासिका मानधनावर नेमणूक केलेल्या कर्मचाऱ्यांची रत्नागिरी जिल्हा प्रशासन शिक्षण विभाग...यांच्या बेजबाबदारपणामुळे शिक्षकांना वेळेत मानधन होत नसल्याचंही यावेळी सांगितले आहे.ज्या दिवशी या कर्मचाऱ्यांना मानधन दिले जाईल त्यावेळेस टाळे उघडले जाईल असा इशारा...रत्नागिरी जिल्हा प्रशासन तसेच राजापूर पंचायत समिती शिक्षण विभाग यांना दीपक नागलेंनी दिला आहे.