मोदी-शाहांकडे बघून भाजपात आलो, केसाने गळा कापू नका, जागावाटपावरून रामदास कदम यांची भाजपवर टीका
1081 views
रत्नागिरी चे व्हिडिओ सबस्क्राईब कराजागावाटपावरून शिवसेना आमदार रामदास कदम भाजपवर चांगलेच संतापले. मोदी-शाहांकडे बघून भाजपत आलो, केसाने गळा कापू नका, माझंही नाव रामदास कदम आहे, असं म्हणत त्यांनी लोकसभेच्या जागावाटपावरून भाजपला इशारा दिला. शिवसेनेचे खासदार असलेल्या मतदारसंघात सुद्धा भाजपचे काही नेते घुसखोरी करत असल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला. तसेच त्यांचे चिरंजीव योगेश कदम यांना भाजपने निवडणुकीत पाडलं असा गंभीर आरोप कदमांनी केला. जागावाटपाची घोषणा व्हायला अवघे काही तास शिल्लक असताना युतीत वादाची ठिणगी पडली आहे.