कोकणात दडलाय समृद्ध लेण्यांचा इतिहास; नदीकिनारच्या पांडवकालीन २९ दुर्मिळा लेण्या पर्यटकांसाठी मोठं आकर्षण
रत्नागिरी चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात पन्हाळे दुर्गे येथील लेणी प्रसिद्ध आहेत ही लेणी पाहण्यासाठी.अवघ्या महाराष्ट्रासह राज्याबाहेरील पर्यटकांनीही या मोठी गर्दी केली आहे. या लेण्यांच्या इतिहासाचा संदर्भ हा थेट तिसऱ्या, चौथ्या शतकापर्यंत जातो.सह्याद्री पर्वतरांगेच्या पायथ्याशी कोटजाई व धाकटी नदीच्या खोऱ्यात हे स्थळ आहे. साधारणतः इ. स. तिसऱ्या शतकापासून ते चौथ्या शतकापर्यंत समृद्ध अशा इतिहासाची साक्ष असणाऱ्या.पांडवकालीन एकूण २९ दुर्मिळा लेण्या खोदण्यात आल्या आहेत. यातील २८ लेण्या या कोडजाई नदीच्या उजव्या किनाऱ्यावर उत्तराभिमुख असून २९ वे लेणे. बागवाडीजवळ 'गौर लेणे' या नावाने प्रसिद्ध आहे. हीनयान (थेरवाद), वज्रयान, शैव, गाणपत्य व नाथ संप्रदायाचा ठसा या लेण्यांवर पडलेला दिसून येतो.१९७२ च्या आसपास या पुरातन लेण्यांचा शोध लागला असून ही लेणी डोंगरात लुप्त होती.समृद्ध निसर्ग संपदा, दूरवर पसरलेली आमराई, एका बाजूला असलेली नदी व किनाऱ्यावर असलेली.. ही लेणी पाहण्यासाठी पर्यटक इथे मोठी गर्दी करतात.