लाडक्या शिक्षकाची बदली, निरोप देताना अख्खं गाव रडलं, विद्यार्थ्यांसह पालकांनाही अश्रू अनावर
सांगली चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
चांगल्या-वाईटाची ओळख पटवणारं, भविष्य घडविणारं, जीवनाला आकार देणारं जर कुणी असेल तर ते म्हणजे आपले गुरु, आपले शिक्षक...चांगले शिक्षक लाभणं फार मोठ्या भाग्याचीच गोष्ट... सांगलीतील जिल्हा परिषद शाळेतील दिलीप वाघमारे हे देखील असेच एक आदर्श शिक्षक म्हणून नावारूपाला आले पण आता वाघमारेंची बदली दुसऱ्या गावांत होतेय म्हटल्यावर हे संपूर्ण गाव हमसून रडतंय...