सांगलीच्या जागेवर काँग्रेसचा दावा, चंद्रहार पाटील म्हणतात ठाकरेंकडून माझीच उमेदवारी फिक्स!
1303 views
सांगली चे व्हिडिओ सबस्क्राईब करासांगली लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसकडून दावा करण्यात येतोय.मात्र शिवसेना ठाकरे गटाकडून या जागेवर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे.माझ्या उमेदवारीबाबत आता मला अजिबात धाकधूक वाटत नाही, असं चंद्रहार पाटील म्हणाले.माझी उमेदवारी मातोश्रीमधून फायनल झालीये, आता शब्द माघारी घेतला जाणार नाही असं चंद्रहार पाटील म्हणाले.माझी उमेदवारी फिक्स आहे, मी प्रचार सुरू केलाय असं चंद्रहार पाटलांनी सांगितलं.