शक्यतो झाडं लावा, नाहीतर तोडा; ही कायद्यातील भंगार ओळ : सयाजी शिंदे
सांगली चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
महाराष्ट्रात सध्या राष्ट्रीय महामार्गाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने झाडांची बेसुमार कत्तल कंत्राटदारांकडून सुरू आहे. याबाबत संबंधित निदर्शनास बाब आणून देखील कोणतीच कार्यवाही होत नाही. सदरची झाडे दुसरीकडे देखील लावली जात नसल्याची खंत सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदेंनी बोलून दाखवली. ते सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे कार्यक्रमात ते बोलत होते. कुंडल येथे जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक, क्रांतिअग्रणी डॉ जी डी बापू लाड यांच्या जन्मशताब्दी निमित्त क्रांतिअग्रणी पुरस्काराने अभिनेते सयाजी शिंदेंना गौरवण्यात आले.