मी लवकरच विशाल पाटील अन् विश्वजीत कदमांची भेट घेणार; तिढा सोडवण्यासाठी चंद्रहार पाटलांचं नवं पाऊल
1471 views
सांगली चे व्हिडिओ सबस्क्राईब करामहाविकास आघाडीत अद्यापही सांगली लोकसभेच्या जागेवरून धुसफुस सुरु असताना ठाकरेंनी सांगलीसाठी उमेदवारी जाहीर केलेल्या चंद्रहार पाटलांनी प्रचाराला दणक्यात सुरुवात केली आहे. कोण काय मागतंय? काय म्हणतंय याकडे आपलं लक्ष नसून उमेदवारीचा विषय माझ्यासाठी संपलाय आता माझं लक्ष फक्त प्रचारावर असल्याचंही चंद्रहार पाटलांनी जाहीर केलं आहे. तसेच, या वादाच्या पार्श्वभूमीवर विशाल पाटील अन् विश्वजीत कदमांची भेट घेण्याची तयारीही चंद्रहार पाटलांनी बोलून दाखवली आहे. स्थानिक पक्ष ते राष्ट्रीय पक्ष सगळ्यांनी उमेदवारीसाठी विचारणा केली होती, असा गौप्यस्फोटही चंद्रहार पाटलांनी यावेळी केला आहे. तसेच, माझ्यासारख्या एका शेतकरी पुत्राला सगळे जण साथ देतील असा विश्वासही व्यक्त केला आहे.