६०० ते ७०० एकरावर गाजराची शेती, कवलापूर गाजराला महाराष्ट्रासह कर्नाटकातही मागणी
1066 views
सांगली चे व्हिडिओ सबस्क्राईब करासांगली शहरापासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर असणारा कवलापुर हे गाव. मिरज तालुक्यामध्ये या कवलापूर गावाचा समावेश आहे. कवलापूर या गावात गाजर शेती मोठ्या प्रमाणत केली जाते, छोट्याशा कवलापूर गावातून शेकडो एकर शेतीवर केवळ गाजराचे उत्पादन घेतले जाते,त्यामुळे "गाजरांचं"गाव म्हणून कवलापुरची ओळख आहे. या गावातील प्रत्येक कुटुंब सधन आहे.मुबलक पाणी यामुळे कवलापूर परिसरात भाजीपाल्याच्या शेतीसह ऊस ,द्राक्ष आणि गाजराचे उत्पादन घेतले जाते.मात्र प्रामुख्याने उसाच्या शेतीबरोबर या ठिकाणी "गाजराची" शेती मोठ्या प्रमाणात केली जाते.