अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू; चिकुर्डे मार्गावरील घटना, अपघातस्थळी बघ्यांची गर्दी!
1070 views
sangli चे व्हिडिओ सबस्क्राईब करासांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात असणाऱ्या चिकुर्डे ते ऐतवडे खुर्द...या मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.घटनेची माहिती मिळताच कुरळप पोलीस आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली.यावेळी बिबट्याला पाहण्यासाठी चिकुर्डे, देवर्डे, ऐतवडे खुर्द व कुरळप परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.मागील आठ दिवसांपासून कुरळप फाटा ते चिकुर्डे रोडवरील दत्तखडी परीसरात सातत्याने बिबट्याचे दर्शन होत आहे.त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते.वन विभागाला वारंवार सूचना देऊनही संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचं ग्रामस्थ सांगतात.