सांगली लोकसभेवरून महाविकास आघाडीत नाराजीनाट्य, ठाकरेंच्या मेळाव्यात कॉंग्रेस सहभागी होणार नाही
सांगली चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
लोकसभा जागेवरून शिवसेना ठाकरे आणि काँग्रेस मधला तणाव वाढला आहे.मिरजेतील आज पार पडणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या जनसंवाद मेळाव्याला न जाण्याचा काँग्रेसने निर्णय घेतलाय.सांगली लोकसभेसाठी ठाकरे गटानं एकतर्फी उमेदवारी जाहीर केलाय तो योग्य नाही असे विक्रम सावंत यांनी म्हटलंय.मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून काँग्रेसला निमंत्रण आलं होतं असं सावंतांनी सांगितलं.काँग्रेसकडून निमंत्रण नाकारले असल्याने दोन पक्षातील तणाव अधिक वाढल्याचे दिसतेय.सांगली हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असून काँग्रेसकडेच ही जागा राहावी अशी भूमिका सावंत यांनी मांडलीय.