ठाकरेंना ठणकावलं, वरिष्ठांनाही इशारा दिला, विश्वजीत कदमांनी मनातलं पहिल्यांदाच बोलून दाखवलं
सांगली चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
सांगली येथे काँग्रेसचा मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह पक्षातील नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी सांगलीच्या जागेसाठी आग्रही असणाऱ्या विश्वजीत कदमांनी मनातील खदखद बोलून दाखवली. सांगलीच्या जागेसाठी राज्यातील आणि देशातील नेत्यांना अंगावर घेतलं असं विश्वजीत कदम म्हणाले. सांगलीतील जागेबाबत सापशिडीचा खेळ झाला दुर्दैवाने आम्हाला साप चावला असं कदम म्हणाले. यावेळी विश्वजीत कदमांनी संजय राऊतांच्या टीकेलाही उत्तर दिलं. मित्र पक्षांना आता सांगा की विधानसभेला आवाज करायचा नाही असं कदम म्हणाले.