ना पद, ना उमेदवारी, वेगळी भूमिका घ्या; रामराजेंकडे भर मंचावर कार्यकर्त्याची मागणी
1242 views
सातारा चे व्हिडिओ सबस्क्राईब करामाढा लोकसभेतून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपनं महायुतीकडून उमेदवारी जाहीर केली.उमेदवारीवरुन तेढ निर्माण झाल्याने माढा लोकसभा मतदारसंघात विचारविनिमय मेळावा घेण्यात आला.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला रामराजेंनी विरोध दर्शवला आहे.यावेळी तुतारी हातात घ्यायला पाहिजे असा आग्रह कार्यकर्त्यांनं रामराजेंकडे धरला.अजित पवारांसोबत गेल्यानं ना पद मिळालं, ना उमेदवारी मिळाली अशी भावना कार्यकर्त्यानं व्यक्त केली.रामराजेंनी शरद पवार यांची तुतारी हाती घ्यावी असा हट्ट कार्यकर्त्यानं धरला.