आधी हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, मात्र मुख्यमंत्र्यांचं साताऱ्यात सेफ लँडिंग
सातारा चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईहून सातारा दौऱ्यावर निघत असताना त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला. त्यामुळे राजभवन येथे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यात ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ आज सातारा जिल्ह्यातील दौलतनगर येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार असल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याला निघाले होते.मात्र हेलिकॉप्टर बिघाडानं झाल्यानं मुख्यमंत्री नियोजित कार्यक्रमला उशिरानं पोहोचले. मुख्यमंत्र्याच्या स्वागताची साताऱ्यात जंगी तयारी करण्यात आली होती. यावेळी जेसीबीतून फुलांची उधळण करत मुख्यमंत्र्यांचं स्वागत करण्यात आलं.