डाव्या बाजूला शिवेंद्रराजे, उजव्या बाजूला उदयनराजे; फडणवीसांची देसाईंच्या मुलाच्या लग्नाला हजेरी
1431 views
सातारा चे व्हिडिओ सबस्क्राईब करामहाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांचे सुपुत्र यशराज देसाई यांचा लग्न सोहळा आज पार पडला. लग्नाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. दरम्यान, त्यांच्यासोबत मंत्री गिरीश महाजन, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे, खा. उदयनराजे भोसले, आ. जयकुमार गोरे, आ. शिवेंद्रराजे भोसले उपस्थित होते. त्यावेळी मला लग्नाला उपस्थित राहायचं होतं, पण मुंबईला मला महत्त्वपूर्ण बैठका असल्यामुळे मला जाव लागणार आहे. त्यामुळे मी लवकर का होईना वधू वर यांना आशीर्वाद देण्यासाठी पोहचलो. अशी भावना यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवली आहे.