छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान प्रकरणी उदयनराजे पोलीस अधीक्षकांच्या भेटीला
1255 views
सातारा चे व्हिडिओ सबस्क्राईब करा१५ ऑगस्ट रोजी एका अल्पवयीन मुलाने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली होती.या प्रकरणात संबंधित युवकाची रिमांड होममध्ये रवानगी केली.या प्रकरणातील मास्टरमाइंड कोण? याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांची भेट घेऊन या प्रकरणावर चर्चा केलीये.छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने जातीय सलोखा कायम राहिला असं उदयनराजे म्हणाले.लोकशाही आबाधित ठेवायचे असेल तर अशी लोक जगात न राहिलेली बरी असं उदयनराजे म्हणाले.याप्रकरणी पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी केली आहे.