भविष्यासाठी अजितदादा सोडून दुसरा चेहराच दिसत नाही, आज ना उद्या दादांना मुख्यमंत्री करू : रामराजे निंबाळकर
सातारा चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
पुढच्या पिढीचा विचार करता आम्हाला महाराष्ट्रात अजित पवारांशिवाय दुसरा पर्यायच दिसत नाही, असं विधान अजित पवार गटाच्या रामराजे नाईक निंबाळकरांनी केलं आहे. दहिवडीतील आयोजित कार्यकर्ता संवाद बैठकीत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. २१ व्या शतकात अजितदादा हेच महाराष्ट्राचा प्रमुख व सक्षम राज्य म्हणून विकास करू शकतील. त्यासाठी अजित पवारांना आम्ही योग्य वेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करू, असं रामराजे निंबाळकर म्हणाले.