गाढ झोपत असताना कालवा फुटला, राहुट्या वाहून गेल्या; ऊसतोड कामगारांचा संसार बुडाला
1770 views
सातारा चे व्हिडिओ सबस्क्राईब करादिवसभर ऊसतोडणी करत काबाडकष्ट करुन थकलेले हे सर्वजण दोन घास पोटात टाकून राहूटीत गाढ झोपेत होते. पण मध्यरात्री तीनच्या सुमारास वाई तालुक्यातील धोम धरणाचा डावा कालवा पांडे गावच्या हद्दीत लेंडी पुलाजवळ फुटला. मोठ्या प्रमाणावर पाणी ओझर्डे गावच्या चंद्रभागा ओढ्यात शिरलं. राहुट्यातून मांडलेला तोडका-मोडका संसार पाण्यात वाहून गेला. साखर झोपेत असणारी ही मडंळी खडबडून जागी झाली. आजुबाजुला असणारं मोलाचं सामानं सोडून आपली इवलीशी बाळं कडेला घेऊन मुक्या जनावरांची सुटका करत जीव वाचवण्यासाठी यांची धडपड सुरु झाली. हा प्रसंग सांगताना उसतोड कामगार म्हणतात...