तिकीट मागायला आपण भिकारी नाही, उदयनराजेंना उमेदवारी न दिल्यानं समर्थक भाजपचा राजीनामा देण्याच्या तयारीत
सातारा चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
भाजपनं लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली.उदयनराजे भोसलेंना साताऱ्यातून उमेदवारी मिळावी यासाठी समर्थक आग्रही आहेत.मात्र या यादीत साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांच्या नावाची घोषणा न केल्यानं त्यांचे समर्थक आक्रमक झाले.भाजपनं अवहेलना केली असं म्हणत समर्थकांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली.तिकीट मागायला आपण भिकारी नाही असं म्हणत उदयनराजे समर्थकांना राग अनावर झाला होता.