साताऱ्यात जलमंदिर मधील आई भवानी देवीचं दर्शन घेऊन उदयनराजेंनी उभारली नववर्षाची गुढी!
सातारा चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
साताऱ्यात खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी जलमंदिरमधील आई भवानी देवीचे दर्शन घेतले.त्यानंतर नववर्षाची गुढी उभारून मनोभावे पूजा केली.यावेळी पत्रकारांशी बोलताना उदयनराजे म्हणाले, संकल्प एकच आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचा जो विचार होता तो म्हणजे सर्वधर्मसमभाव.हाच विचार प्रत्येकाने आचरणात आणला पाहिजे, तरच या देशाची अखंडता टिकून राहील.जगभरातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून तिचा उल्लेख केला जातो तो देश म्हणजे आपला भारत.या देशाला अखंड ठेवायचे असेल, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचारच देशाला अखंड ठेवू शकतो.