साहेब, तुम्ही खासदार होणार आणि मी पवारांच्या नातूच्या विरोधात लढणार, वंचितच्या नेत्याचं साताऱ्यात तुफान भाषण!
सातारा चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
साताऱ्यात वंचितची 'संविधान जागृती सभा' (७ ऑक्टोबर) ला पार पडली. यावेळी वंचितचे नेते ॲड. अरुण जाधव यांनी प्रकाश आंबेडकरांसमोरच दमदार भाषण ठोकलं. ते म्हणाले, साहेब, तुम्ही खासदार होणार आहात, दिल्लीला जाणार आहात. मी पण विधानसभा लढविणार आहे, ती पण शरद पवारांच्या नातूच्या विरोधात लढणार आहे. मी गब्बर आहे, गब्बर ..सर! आम्ही दोघेपण २०२४ ला निवडून येणार आहोत. पण मी सरांना विनंती करणार आहे, की मला गृहमंत्री करा साहेब. गृहमंत्री यासाठी म्हणतोय, 'जो जो गरिबावर अन्याय करतो, त्याच्याबरोबर आम्हाला लढायचं आहे'. पोलीस खात्याला माझी विनंती आहे. 'मी गृहमंत्री होणार आहे, लक्षात ठेवा. मी गृहमंत्री होणार आहे'. साहेब, मला गृहमंत्री करणार आहेत. माझं एकच स्वप्न असा आहे, 'पहिली फाशी नंतर चौकशी..!'