एकाच वेळी एका हाताने पेटी अन् दुसऱ्या हाताने पियानो वाजवतो; जादुई सूरांची अनुभूती देणारा कोकणचा विजय
6867 views
सिंधुदुर्ग चे व्हिडिओ सबस्क्राईब करादैवी देणगी, अचाट बुद्धिमत्ता अन् असामान्य प्रतिभा असलेला हा कोकणचा १२ वर्षीय विजय तुम्हाला थक्क करेल...कोकणचा आईनस्टाईन अशी ओळख बनलेल्या वेंगुर्ल्यातील तुळस गावचा विजय तुळसकर सहावीत शिकतोय...पण ही मूर्ती जरी लहान दिसत असली तरी किर्ती महानच आहे...इतर अनेक गोष्टींसह गायन-वादनाचा विशेष टॅलेंट विजयकडे आहे...पेटी उलट असो वा सुलट, सूर हालणार नाही, दोन हातात दोन वेगवेगळी वाद्या घेऊन तो अशी काही सुरेल जादू करतो की बास्स...अन् त्याने वाजवलेलं भारत-अमेरिकेचं एकाचवेळी वाजवलेलं राष्ट्रगीत ऐकाल तर थक्कच व्हाल