Rabbit Business : BE शिक्षण, खाजगी कंपनीत नोकरी; बिझनेस खुळ डोक्यात, ससा पालन व्यवसाय 'सक्सेसफुल'!
1196 views
सिंधुदुर्ग चे व्हिडिओ सबस्क्राईब कराकोकणातील तरुण पिढी मुंबई-पुण्यासारख्या मेट्रो सिटीमध्ये नोकरीसाठी न जाता व्यवसायामध्ये नवनवे प्रयोग करताना पाहायला मिळतेय.... आणि त्यातलंच एक उदाहरण म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यामधील निरुखे या खेडेगावामधील हा तरुण... बीई टेलीकम्युनिकेशन मध्ये शिक्षण घेतलेल्या तरूणाने ससा पालन व्यवसाय सुरु केला आणि वर्षाला आता लाखोंची कमाई करतोय....निलेश गोसावी असं या तरुणाचं नाव आहे... तो याआधी एका खाजगी कंपनीमध्ये काम करायचा. पण मनात व्यवसाय करण्याची त्याची जिद्द होती. कोणता व्यवसाय करावा याबाबत तो सातत्याने सगळीकडून माहिती घ्यायचा. त्यातूनच ससा पालन करण्याचा निर्णय झाला. सुरुवातीला हरियाणामधून दोन ससे निलेश घेऊन आला. आणि आता ससे व्यवसाय सक्सेस झालाय.