Uddhav Thackeray पुन्हा CM व्हावेत... गाऱ्हाणं घालण्यासाठी विनायक राऊतांनी पुजाऱ्याला सांगितलं
सिंधुदुर्ग चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
कोकण दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक आंगणेवाडीच्या भराडी देवीचं दर्शन घेतलं. यावेळी उद्धव ठाकरे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी गाऱ्हाणं घालण्यात आलं. उद्धव ठाकरे यांच्यासोबत विनायक राऊत, भास्कर जाधव, वैभव नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उद्धव ठाकरे एकदा मुख्यमंत्री म्हणून आलेले आहेत, परत मुख्यमंत्री म्हणून यावेत यासाठी गाऱ्हाणं घालण्यासाठी विनायक राऊत यांनी पुजाऱ्याला सांगितलं. यानंतर पुजाऱ्यांनीही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ दे म्हणून भराडी देवीला साकडं घातलं.