सोन्या बैलाच्या खरेदीसाठी चंद्रकांत पाटलांनी मागणी केली, शेतकऱ्यानं स्पष्ट नकार दिला
1319 views
सोलापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करासोलापुरातील श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनात सोन्या बैलाने सर्वांना आकर्षित केले आहे.तीन दिवसांच्या कृषी प्रदर्शनात फक्त एकच नावाची चर्चा ,ती म्हणजे सोन्या बैलाची.राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे देखील कृषी प्रदर्शनात आले.चंद्रकांत पाटील यांनी कृषी प्रदर्शनात आल्यानंतर सोन्या बैलाकडे जाऊन पाहणी केली.विविध प्रदर्शनात सोन्याला वेगवेगळ्या किंमती लावून मागणी करण्यात आली होती.बैलाचे मालक विद्यानंद आवटी यांनी हे अनमोल बैल आहे, याच्या मुळे आमची ओळख दोन राज्यात झाली आहे अशी माहिती दिली.खुद्द चंद्रकांत पाटील यांनी याची किंमत विचारली आणि एक कोटी रुपये किंमत आली तर विक्री करणार का?असे विचारले.शेतकरी विद्यानंद आवटी यांनी कोट्यावधी रुपये आले तरी सोन्याला विकणार नाही असे सांगितले.