वादग्रस्त कालीचरण महाराज धाराशिव लोकसभा निवडणूक लढवणार?, सोलापूर दौऱ्यात पत्रकारांच्या प्रश्नावर थेट उत्तर!
1075 views
सोलापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब कराधर्मगुरू कालीचरण महाराज हे ५ नोव्हेंबरला रात्री सोलापूर दौऱ्यावर आले होते. सोलापूर शहरातील शिवस्मारक सभागृहात त्यांनी हिंदू समाज बांधवाना संबोधित केले. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली, यावेळी त्यांनी राजकारणात रुची दाखवली. जनतेची इच्छा असेल तर जरूर निवडणूक लढवेन असं कालीचरण महाराज म्हणाले. पण मी खूप कडवा आहे, मला कोण तिकीट देणार असंही स्पष्टपणे त्यांनी सांगितले. राजकारणात कडवे लोक चालतील का? मी स्पष्टपणे आणि सत्य बोलणारा व्यक्ती आहे. आम्ही राजा बनणारे लोक नसून राजा बनवणारे लोक आहोत असंही ते यावेळी म्हणाले. कालिचरण महाराज धाराशिव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढतील अशा चर्चा सुरु आहेत. पण मला याबाबत अजूनही काही काही माहिती नाही, असं कालिचरण महाराज म्हणाले आहेत.