विखे पाटलांच्या अंगावर भंडारा उधळला, धनगर समाजाच्या आरक्षणावरुन कार्यकर्ता आक्रमक, पोलिसांनी घेतलं ताब्यात!
2131 views
सोलापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब कराराज्यभरात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वातावरण तापलेलं पाहायला मिळत आहे. त्यानंतर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नये म्हणून ओबीसी समाजही आक्रमक झाला आहे. आता धनगर समाजही आरक्षणासाठी आक्रमक झाला असून त्यांचेही पडसाद पाहायला मिळले. सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळून जाहीर निषेध नोंदवला. सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात हा सर्व प्रकार पाहायला मिळाला आहे. सोलापुरात पालकमंत्री विखे पाटील यांना निवेदन देण्यासाठी हा कार्यकर्ता आला होता. निवदेन देत असतानाच त्याने पालकमंत्री विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळला. शेखर बंगाळे असं या कार्यकर्त्यांचं नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.