नाशिकहून मृतदेह करमाळ्यात आणून टाकला, पोलिसांनी १६ तासांत छडा लावला
1132 views
सोलापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करामृताची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी अवघ्या १६ तासांत गुन्ह्याचे धागेदोरे शोधून काढले. आणि या हत्येप्रकरणी दोघा भावांना पोलिसांनी अटक केली आहे. आईबरोबर अनैतिक संबंध ठेवल्यामुळे चिडून दोघा भावांनी अन्य एका महिलेसह कट रचून हा खून केल्याचे समोर आले आहे.आपल्या आईबरोबर मृत श्रावण चव्हाण याचे असलेले अनैतिक संबंध उजेडात आल्यामुळे सुनील आणि राहुल हे दोघे घाडगे बंधू चिडले होते. त्यांनी एका महिलेला सोबत घेऊन श्रावण चव्हाण याच्या खुनाचा डाव रचला. त्याप्रमाणे त्यांनी श्रावण चव्हाण यास गावात बोलावून घेतले. नंतर एका महिलेसह घाडगे बंधुंनी मिळून श्रावण चव्हाण याचा खून केला. नंतर त्याच्याच स्विफ्ट मोटारीत मृतदेह घालून दूर अंतरावर करमाळा भागात आणून माळरानावर टाकून दिला. मोटारीसह मृतदेह अर्धवट जळाला होता.