मराठा आंदोलकांची भूमिका टोकाला; आरक्षणासाठी जिवंत तरुण स्मशानभूमीत सरणावर
1153 views
सोलापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब कराराज्य सरकारच्या निषेधार्थ आणि सरसकट मराठ्यांचा ओबीसी प्रवर्गात समावेश करावा, या मागणीसाठी तरुणाने जिवंतपणी समाधी घेतली आहे.समाधी आंदोलन बेमुदत असल्याच छावा संघटनेच्या वतीने माहिती देण्यात आली आहे.राष्ट्रीय छावाचे तालुकाध्यक्ष रतिकांत पाटील हे सरणावर झोपून तळे हिप्परगा येथील मराठा हिंदू स्मशानभूमीमध्ये बेमुदत जिवंत चिता समाधी आंदोलनाला सुरुवात केली आहे.मराठा समाजाच्या तरुणाने आरक्षणासाठी स्वतःची जिवंतपणी अंत्ययात्रा काढून राज्य सरकारचा निषेध केला आहे.गावातील शेकडो मराठा बांधव जिवंत अंत्ययात्रेत सहभागी झाले होते.मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन बेमुदत काळाकरिता चालू राहणार आहे.