निवडणूक आयोगासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत सुनावणी, जयंत पाटलांचं पंढरपुरात विठ्ठलाला साकडे!
1892 views
सोलापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब कराआज (६ ऑक्टोबर) निवडणूक आयोगासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत सुनावणी होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज सोलापुरातील पंढरपूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांना निवडणूक आयोगासमोर होणाऱ्या सुनावणीवर प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, भारतात पक्षाच्या चोऱ्या होण्याचे प्रमाण वाढले आहे. पक्षाची चोरी होवू नये, यासाठी श्री विठ्ठलाने निवडणूक आयोगाला योग्य अशी बुद्धी द्यावी. एका पक्षाची चोरी झाली दुसऱ्या पक्षाची चोरी होणार नाही. यासाठी आता विठ्ठलाची परीक्षा आहे. असे ही साकडे राष्टवादीचे जयंत पाटील यांनी श्री विठ्ठलाला घातले. बहुसंख्य लोक शरद पवार यांना पाठिंबा देत आहेत, ही बाजू न्यायालयात ऐकून घेतली जाईल. २७ राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. बहुसंख्य पदाधिकारी सगळे शरद पवार यांच्या सोबत आहेत. आमची प्रतिज्ञा पत्र संख्या जास्त आहे तर समोरच्या लोकांची ५० हजारांपेक्षा कमी आहे. चुकीचा निर्णय झाला तर न्यायालयात जावे लागेल. पण तसे होणार नाही असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.