धैर्यशील मोहिते पाटलांच्या शरद पवार गटातील प्रवेशानंतर माढ्याच्या वंचितच्या उमेदवाराचे सडतोड सवाल
1074 views
सोलापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करावंचितने माढ्यातून मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांना उमेदवारी दिली आहे. मटाशी संवाद साधताना रमेश बारसकर यांनी अनेक मुद्द्यावर भाष्य केलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी धैर्यशील मोहिते पाटलांच्या पक्षप्रवेशावर टीका केली आहे.धैर्यशील मोहिते पाटील हे स्वतःच्या भावाचा मन परिवर्तन करू शकले नाहीत... तर ते मतदारांचं मन परिवर्तन कसे करू शकतील? असा सवाल त्यांनी केला आहे. मोहिते पाटील यांच्या चौकशा लागल्या आहेत, त्या चौकशा होऊ नये म्हणून त्यांना भाजप मध्ये ठेवलंय का? निवडून गेल्यावर भाजपशी सलगी करणार का? असे सवाल वंचितचे उमेदवार रमेश बारसकर यांनी यावेळी केले आहे. यावेळी बोलताना त्यांनी शरद पवार यांच्यावर देखील टीका केला आहे.