८ वर्षांनी तुरुंगातून परतले, रमेश कदमांची विधानसभेसाठी मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरु
1415 views
सोलापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करामोहोळ विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार रमेश कदम आठ वर्षांनंतर तुरुंगातून परतले.रमेश कदम यांच्या समर्थकांनी जंगी स्वागत करत,रमेश कदम यांची मिरवणूक देखील काढली.मोहोळ नगरपरिषद समोर मोठी जाहीर सभा देखील झाली.यावेळी माजी आमदार रमेश कदम यांनी राजकीय निशाणा साधला.यावेळी राजकारणात सत्तेसाठी काहीही करणारी माणसं आहेत असं कदम म्हणाले.मागेल त्याला पाणी आणि मागेल त्याला रस्ता योजना मोहोळ मध्ये सुरू करणार असंही त्यांनी सांगितलं.