सोलापूरला २०१४ आणि २०१९ चे प्रयोग फसले, आता भाजप नवा चेहरा उतरवणार?
1041 views
सोलापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करासोलापूर लोकसभा मतदारसंघ.. इथे भाजपने आतापर्यंत दोन प्रयोग केले आणि पाच वर्षांची टर्म पूर्ण झाल्यानंतर दोन्ही प्रयोग फारसे यशस्वी ठरले नसल्याचं पक्षाच्या लक्षात आलं.. सुशिल कुमार शिंदेंसारख्या नेत्यांना मोदी लाटेने नेस्तनाभूत केलं खरं, पण त्याबदल्यात जिल्ह्यातल्या लोकांना जी अपेक्षा होती ती पूर्ण झाली नाही.. परिणामी यावेळी पुन्हा एकदा भाजपातून नव्या चेहऱ्याची एंट्री होणं अपेक्षित आहे आणि त्यासाठी जिल्ह्यातलंच एक नाव समोर येतंय.. ज्या नेत्याने गेल्या निवडणुकीत तिकीट न दिल्यामुळे भाजपविरोधातच दंड थोपटले त्याच नेत्याने लोकसभेसाठी तयारी सुरु केलीय खरी, पण खरंच पक्षाकडून तिकीट दिलं जाईल का.. या नेत्याची नेमकी तयारी कशी सुरुय तेच या व्हिडीओत पाहू..