प्रणिती शिंदेंच्या रागाला कार्यकर्ता वैतागला, धडा शिकवण्यासाठी थेट काॅल रेकाॅर्डिंग व्हायरल
1144 views
सोलापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करासोलापूर शहरात निवडणुकीच्या रणधुमाळीत वेगवेगळ्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी सोलापुरात आमदार प्रणिती शिंदे व एका कार्यकर्त्यांची कॉल रिकॉर्डिंग व्हायरल झाली. कर्णिक नगर येथील बाबूराव क्षीरसागर यांच्या सोबत झालेल्या संभाषणाची कॉल रिकॉर्डिंग होती. बाबूराव क्षीरसागर यांनी माध्यमांना माहिती देत प्रणिती शिंदेच्या कार्यशैलीवर सडकून टीका केली. पंधरा वर्षांपासून काँग्रेसचं काम केलं पण प्रणिती शिंदेंच्या अहंकाराला कंटाळून काँग्रेस पक्ष सोडला आणि भाजपात प्रवेश केला. कॉल रिकॉर्डिंग व्हायरल होताच भाजपचे राम सातपुतेंच्या कार्यकर्त्यांनी संबंधित कार्यकर्त्यांचा शोध घेत जवळपास २० ते २५ जणांना भाजपमध्ये सामावून घेतलं आहे. प्रणिती शिंदेंना धडा शिकवायचा होता म्हणून कॉल रिकॉर्डिंग व्हायरल केली असं हा कार्यकर्ता म्हणाला.