सोलापूरचा खासदार चोरीला गेला, खासदार सिद्धेश्वर महाराज बेपत्ता; ठाकरे गटाकडून आंदोलन
1070 views
सोलापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब कराउद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक सोमवारी सकाळी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार हरवले आहेत अशा मागणीचे निवेदन घेऊन आले होते.सोलापूरचे भाजप खा.डॉ जय सिद्धेश्वर महाराज हे गेल्या पाच वर्षांपासून सोलापूर लोकसभा मतदारसंघात दिसतच नाही अशी खंत उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे.२०१९ साली शिवसेना व भाजप अशी युती होती, त्यावेळी आम्ही जीवाचं रान करून भाजपच्या खासदाराला निवडून आणलं होतं अशी प्रतिक्रिया ठाकरे गटानं दिली.खासदार आज सोलापूर मतदारसंघात दिसतच नाही असे मत उद्धव ठाकरे गटानं व्यक्त करत घोषणाबाजी केली.खासदार गेल्या अनेक वर्षांपासून बेपत्ता आहेत त्यांना शोधा अशी मागणीही शिवसेना ठाकरे गटानं केली आहे.