सुट्टी न देणं पडलं महागात; सोलापूरच्या शिक्षकाने मुख्याध्यापकांना चोपलं, कारवाईची मागणी
सोलापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
वरिष्ठांकडे सुट्टी मागणं म्हणजे एक मोठं अग्निदिव्यच असतं...सर्वच क्षेत्रात याबाबत सारखीच स्थिती आहे...परंतु सुट्टी दिली नाही म्हणून प्रकरण थेट हाणामारीपर्यंत पोहोचल्याचा धक्कादायक प्रकार सोलापुरातील जिल्हा परिषद शाळेत घडलाय...रजेच्या कारणावरून वाद होऊन सहशिक्षकाने मुख्याध्यापकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना कुंभारी येथील जिल्हा परिषद शाळेतून समोर आलीय...मुख्याध्यापकांच्या म्हणण्यानुसार या सहशिक्षकांने त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण केलीय...