सोलापूर जिल्हा न्यायाधीशांची सेवानिवृत्ती; फुलांचा वर्षाव करत दिला निरोप
1099 views
सोलापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करासोलापूर जिल्हा न्यायालयाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. शब्बीर अहमद औटी हे आपल्या ३२ वर्षांच्या प्रदीर्घ न्यायिक सेवेतून निवृत्त झाले. सोलापूर जिल्हा न्यायालयात सेवानिवृत्त न्यायाधीशाना फुलांचा वर्षाव करत साश्रू नयनांनी निरोप दिला.जन्मतः दिव्यांग असूनही अधिक कार्यक्षमता, गुणवत्ता आणि संवेदनशीलता जपत न्यायदानाचे कार्य त्यांनी केलं.न्या. डॉ. औटी यांना निरोप देताना संपूर्ण न्यायालयातील सहकारी आणि कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू आले होते.सहकाऱ्यांकडून प्रेमाचा निरोप स्वीकारताना न्या. डॉ. शब्बीर अहमद औटी यांच्याही डोळ्यातुन अश्रूधारा बरसल्या.डॉ शब्बीर अहमद औटी यांची ३२ वर्षांपूर्वी सोलापूर जिल्हयातूनच न्यायाधीश म्हणून सेवा सुरू झाली होती. ३२ वर्षांपूर्वी सुरू झालेला प्रवास पुन्हा सोलापूर जिल्ह्यातच संपला.