गुणरत्न सदावर्तेंवर अजिबात विश्वास नाही; ST संपात पुन्हा सहभागी न होण्याची कर्मचाऱ्यांची भूमिका
1077 views
सोलापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करादिवाळीचा बोनस,सातवं वेतन आयोगासह अशा विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी पुन्हा संपावर . जाणार असल्याचं गुणरत्न सदावर्तेंनी जाहीर केलं आहे. हाविकास आघाडीची सरकार असताना, राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी जवळपास ६ महिने संप.. पुकारून एसटी सेवा बंद ठेवली होती. तसाच संप आता पुन्हा एकदा होणार अशी माहिती गुणवंत सदावर्तेंनी दिली. मात्र, गुणरत्न सदावर्तेंच्या आवाहनाला सोलापूर एसटी कर्मचाऱ्यांनी कोणताही पाठिंबा दर्शवलेला नाही. उलट, गुणरत्न सदावर्तेंनी एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक केल्याची प्रतिक्रिया या एसटी कर्मचाऱ्यांनी दिली. आता यापुढे कसल्याही प्रकारच्या संपात सहभागी होणार नसल्याची माहिती एसटी कर्मचाऱ्यांनी दिली आहे.