कुणबी प्रमाणपत्राला विरोध करणाऱ्या मराठा तरुणावर मराठा क्रांती मोर्चाने ओतलं ऑइल, तानाजी सावंतांवर टीका!
1139 views
सोलापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करामराठा आरक्षण आंदोलन चांगलेच पेटले असताना मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या एका कार्यकर्त्याला रस्त्यावर अडवून त्याच्या अंगावर काळे तेल टाकण्यात आले. त्यानंतर थेट जाब विचारत मराठा समाजाची जाहीर माफी मागण्यास भाग पाडण्याचा प्रकार घडला. प्रताप कांचन असे या प्रसंगाला सामोरे गेलेल्या तरूण कार्यकर्त्याचे नाव आहे. कांचन हे मराठा समाजाचे असूनही त्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला. त्याबद्दल ही संतप्त प्रतिक्रिया होती, असे यांवेळी तेल टाकलेल्या कार्यकर्त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या भूमिकेवर जोरदार टीका केली.