५० हजार रुपयांच्या पावणे दोन लाख अगरबत्त्या, २०० किलो वजनाच्या पर्यावरण पूरक बाप्पांचं कौतुक!
डोंबिवलीतील बालभवनमध्ये अगरबत्ती महोत्सव भरवण्यात आला आहे. पण यात विशेष गोष्ट म्हणजे हा गणपती या महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरत आहे. यात कलाकारांनी चक्क पावणे दोन लाख पर्यावरण पूरक अगरबत्त्यांपासून आकर्षक गणपती तयार केलाय. या बाप्पांचं वजन २०० किलोच्या आसपास असून नागरिकांनी कौतुक केले आहे. बाप्पाप्रमाणेच या प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या अगरबत्त्यांही तितक्याच आकर्षक ठरला आहे.
Curated by Vishranti Shinde|TimesXP Maharashtra|17 Sept 2023