कार्यकर्त्यांच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी सुरक्षारक्षकावर हात का उगारला?
ठाणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी नेहमीच कार्यकर्त्यांचा गराडा असतो.एकनाथ शिंदे यांच्यासोबत एक फोटो मिळवण्यासाठी कार्यकर्ते धडपडत असतात.एका कार्यकर्त्यांचा हट्ट पुरवण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी खासगी निवासस्थानाबाहेर त्यांचा ताफा थांबवला. या कार्यकर्त्यांसोबत शिंदे यांनी फोटोही काढले.मात्र यावेळी फोटो काढताना कार्यकर्त्यांना हटकणाऱ्या सुरक्षारक्षकावर शिंदे चांगलेच चिडले.