प्रभू रामांवर वादग्रस्त विधान, जितेंद्र आव्हाडांच्या खासगी निवासस्थानाबाहेर अजित पवार गट आक्रमक
2479 views
ठाणे चे व्हिडिओ सबस्क्राईब कराराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचं शिर्डीत दोन दिवसीय शिबीर आयोजित करण्यात आलं आहे.या शिबिरमध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं.राम हा शाकाहारी नव्हता, तर मांसाहारी होता. त्याने १४ वर्ष वनवास भोगला होता.मग ते शाकाहारी कसे असू शकतात?, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला.त्यांनी केलेल्या या वक्तव्यावरून ठाण्यात अजित पवार गट आक्रमक झालेला पाहायला मिळाला.आव्हाडांच्या खासगी निवासस्थानाबाहेर अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी महाआरतीचा प्रयत्न केला.पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याने आव्हाडांच्या घराबाहेर गोंधळाचे वातावरण दिसले.