पहिल्या पावसात कल्याण डोंबिवली महापालिकेची पोलखोल; गटारातील पाणी नागरिकांच्या घरात, कुटुंबाची रात्रभर धडपड
1062 views
ठाणे चे व्हिडिओ सबस्क्राईब कराकल्याण डोंबिवली महानगरपालिका नालेसफाईचा दावा करत आहे मात्र ही नालेसफाई पहिल्याच पावसात फोल ठरली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास कल्याण डोंबिवली मध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे कल्याण पत्री पूल परिसरामधील काही घरांमध्ये पाणी शिरले रात्री दोन वाजल्यापासून लहान मुलांसह नागरिकांचे हाल होत आहे . काल (२५ जून २०२३) रात्री २ वाजण्याच्या सुमारास पावसाचा जोर वाढत गेला आणि नाल्याचे पाणी घरात शिरण्यास सुरुवात झाली. अनेक घरात पावसाचे पाणी शिरले होते. नागरिकांना चक्क गुडघ्यावर पाण्यात रात्र काढावी लागली.